सारा न्यूज नेटवर्क -
कै.बसन्ना साताप्पा कोरे, सोरेगाव यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त;
नातू श्री आनंद कोरे यांची मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी देणगी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- भूतदयेची भावना जपत मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी आनंद कोरे यांनी जी आय बी फाउंडेशनचे सचीव राजकुमार कोळी यांच्याकडे तीन हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
लॉकडाउन मधे सोलापूर ते सोरेगाव जलवाहिनी मधे अडकलेल्या कुत्र्याच्या सुटकेसाठी राजकुमार कोळी यांनी केलेली धडपड बघून संस्थेच्या कार्यात हातभार लावण्याचख निश्चय केला. अहिंसा आणि परोपकाराची शिकवण लाभलेले जैन गुरुकुल चे विद्यार्थी सोरेगाव चे रहिवासी व्यावसायिक श्री आनंद कोरे यांनी संस्थेच्या वतीने मुक्या प्राण्यांच्या उपचारासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आपले आजोबांच्या द्वितीय स्मृती दिनानिमित्त पारंपारीक जेवणावळीच्या प्रथांना फाटा देत, आजोबांच्या भुतदयेच्या शिकवणीवर वाटचाल करत मुक्या जिवांच्या उपचारासाठी लागणारे खर्च भागवण्यासाठी तीन हजार रुपयांचा धनादेश देऊन आपल्या आजोबांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली आहे.
या वेळी कै. बसन्ना साताप्पा कोरे यांच्या समाधीस श्रद्धांजली अर्पण करुन कुटुंबातील सदस्यांनी आपल्या भावनेला वाट मोकळी करून दिली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री पंकज चिंदरकर, सचीव राजकुमार कोळी यांचेसह कोरे कुटुंबातील सदस्य त्यांच्या कोरेगाव येथील शेतात समाधीस्थळी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment