सारा न्यूज नेटवर्क -
महावितरण कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी..
सोलापूर (प्रतिनिधी) :- भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालय येथे नूतन शाखाधिकारी मा. श्री. अजय चव्हाण साहेब व जनमित्रांच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे, निलकंठ कांबळे, मेहबूब बागवान, धुळाप्पा टेळे, जुल्फिकार शेख, अनिल बनसोडे, सोमनाथ कोनाळे, गुंडाप्पा बनसोडे, अजीम सय्यद, संभाजी रूपनर, मल्लिनाथ मुन्नोळी, हिना बागवान, अपेक्षा बहादुरे, चंद्रकला शिंदे, नितीन कोळी, आयाज बेपारी, फहीम शेख आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment