Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, October 18, 2024

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

 शस्त्र परवान्यापासून वाहने, डिजिटल फलकांवर निर्बंध पोलीस आयुक्त एम राजकुमार 


सोलापूर (प्रतिनिधी ):- आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गुरुवारी तब्बल सात आदेश काढले आहेत. जे जनसामान्यांपासून उमेदवार व त्यांच्या संबंधित व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी अनिवार्य असतील. शस्त्र परवानाधारकांनी शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्याबाबत हे आदेश आहेत.

विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यानुसार निवडणुकीच्या प्रक्रियेस १५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर असा आचारसंहिता कालावधी आहे. यादरम्यान सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेस धोका पोचण्याची शक्यता आहे. याकाळात परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास बंदीचा हा आदेश आहे. पोलिस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्दीतील शस्त्र परवानाधारकापैकी बँका, एटीएम सेंटर, शासकीय व खासगी कार्यालय येथील सुरक्षा रक्षकांनी त्यांच्याकडील शस्त्र जमा करण्यापासून सवलत मिळण्यासाठी अर्ज दिल्यास त्यांना सूट मिळणार आहे.

यासह आहेत हे आदेश. 

निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटार गाड्या/ वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत. राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणुकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक व भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहिणे इत्यादीकरिता खासगी जागा, इमारत, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाच्या परवानगीशिवाय व परवाना न घेता लावले तर ते दोषी ठरवण्यात येतील. धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थाच्या जागेमध्ये किंवा त्यांच्याजवळ तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करता येणार नाहीत.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे



No comments:

Post a Comment