सारा न्यूज नेटवर्क -
शहर उत्तर मधून जेष्ठ पत्रकार विजयकुमार उघडे निवडणुकीच्या रिंगणात.
सोलापूर (प्रतिनिधी) :- येथील लोकप्रिय दैनिक जय हो च्या माध्यमातून सर्वसामान्य तसेच वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी नेहमीच प्रयत्न करणारे दैनिक जयहो चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार विजयकुमार उघडे 248 शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी 248 ,शहर उत्तर यांच्याकडे फॉर्म सादर करतेवेळी उमेदवार विजयकुमार उघडे पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जय हो कामगार संघटनेची शहराध्यक्ष प्रशांत बनसोडे पत्रकार अक्षय बबलादे सामाजिक कार्यकर्ते घोडके दीपक, माने ,विश्व परिवर्तन फाउंडेशन पर्यावरण विभाग प्रदेशाध्यक्ष बुरान काजी जय हो कामगार संघटना सदस्य आयुब भाई शेख ...विजयकुमार उघडे व जय हो मित्रपरिवार मोठ्या संख्येने आदी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment