सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक विजयालक्ष्मी कुरी यांचा वाढदिवसानिमित्त इको नेचर क्लब कडून रोप देऊन सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी ):- जनसामान्य माणसांचा आधार तर गुंडांचा कर्दनकाळ समजले जाणारे वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्याचबरोबर गुन्हेगारी रोखण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे सोलापूर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) विजयालक्ष्मी कुरी यांना रोप देऊन इको नेचर क्लब कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
विजयालक्ष्मी कुरी यांनी पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष कामगिरी बजावत उत्कृष्ट कार्य केलेले आहे. सोलापूर शहरातील महिला निवारण तक्रार केंद्राच्या त्या प्रमुख होत्या.अनेक महिलांच्या तक्रारीचे निवारण करून अनेकांचे संसार उभा केलेला आहे. आता सोलापूर ग्रामीण मध्ये आपले कर्तव्यदक्ष ड्युटी निभावत आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक वृक्षांची लागवड ही पोलीस मुख्यालयाच्या परिसरात करण्यात आली आहे.
यावेळी इकोनेचर क्लबचे मुख्य प्रवर्तक डॉ मनोज देवकर व वृक्षप्रेमी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे उपस्थित होते
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment