सारा न्यूज नेटवर्क -
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या वाढदिवसानिमित्त;
संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशन तर्फे अन्नपूर्णा योजना सुरू..
सोलापूर,मंद्रुप (प्रतिनिधी) :- संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशनचे कुटुंबप्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री.अजित लकडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त मंद्रुप गावात अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेची सुरुवात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे सर व सौ.प्रमिला अजित लकडे मॅडम यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
या योजने अंतर्गत मंद्रुप गावात दर शुक्रवारी अन्नदान सेवा देण्यात येणार आहे.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक राठोड,वैद्यकीय अधिकारी गावडे मॅडम,संघर्ष योद्धा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे,पोलीस पाटील प्रवीण राठोड,जगदीश हेळकर,मरुळाराध्य हिरेमठ,शाम गोसावी,उत्कर्ष भागवत,खय्युम मोमीन,प्रसाद खांडेकर,ज्ञानेश्वर केवटे,श्री टेळे,रवी केवटे,अजय साठे,राजू कोरे,शंतनू जोडमोटे,दत्तात्रय साठे,अनिकेत केवटे,अयोग्य सेवक गौतम खिलारे,आदी उपस्थित होते.
आव्हान
ही योजना अविरतपणे दर शुक्रवारी मंद्रुप येथे राबविण्यात येणार आहे,
सर्वानी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून अन्नदान करण्याचे आव्हान फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment