सारा न्यूज नेटवर्क -
दक्षिणमधून युवराज राठोड यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भरला उमेदवारी अर्ज;
यंदा परिवर्तन घडवणार : युवराज राठोड..
सोलापूर (प्रतिनिधी) :- दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रस्थापितांना आव्हान देणाऱ्या य आघाडीचे निमंत्रक युवराज राठोड यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून एक प्रकारे विरोधातील उमेदवारांना टेन्शन देत आव्हान दिले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मातब्बरांना एकत्र करून युवराज राठोड यांनी दक्षिण सोलापूर परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली. त्याच्या माध्यमातून त्यांनी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. यापूर्वी २०१९ ची विधानसभा निवडणूक राठोड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लढवली होती.
त्यामुळे युवराज राठोड यांना दक्षिण मतदारसंघाचा अनुभव आहे. या मतदारसंघात बंजारा समाजाची सुमारे ४० ते ५० हजार मतदान असल्याचे सांगण्यात येते. युवराज राठोड यांनी गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण विधानसभेत दौरे करून विविध उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क ठेवला आहे या संपर्काचा त्यांना फायदा होणार असल्याचा विश्वास युवराज राठोड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment