सारा न्यूज नेटवर्क -
वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांचा सत्कार संपन्न ;
अनेक पत्रकार व संपादकांची उपस्थिती..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहर जिल्हा मध्ये मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे.यांच्या या सेवा कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या कडून वसुंधरा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पत्रकार संरक्षण समितीचे शहर अध्यक्ष व साप्ताहिक "जय हो"चे संपादक विजयकुमार उघडे यांच्या हस्ते सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांचा शाल पुष्पगुछ व मिठाई भरवून सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी साप्ताहिक, दैनिक, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, न्यूज पोर्टल, YouTube चॅनेल अशा विविध क्षेत्रातील पत्रकार व संपादकांची उपस्थिती होती. यामध्ये
सादिक शेख, प्रसाद जगताप, इम्तियाज अक्कलकोटकर, युनूस आत्तार, अक्षय बबलाद,लतीफ नदाफ, अस्लम नदाफ, अप्पासाहेब लंगोटे, अशोक ढोणे, सतीश गडकरी, डॉ कीर्तीपाल गायकवाड, यू एफ जानराव, कलीम शेख, इम्रान आत्तार, अशपाक शेख, इकबाल शेख, फारुख शेख, वैजिनाथ बिराजदार इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment