Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Friday, October 11, 2024

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क

महालक्ष्मी नगर येथे पाणी पाईपलाईन करा, मानवाधिकार संघटनेचा बेमुदत धरणे आंदोलन. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरात महालक्ष्मी नगर 67 पेठ, शहर हद्दवाढ विभाग  येथे पिण्याच्या पाणीची पाईपलाईन करा म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने  दिनांक 07/09/2023 पासून सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदन द्वारे मागणी करण्यात आली परंतु महापालिका प्रशासनाने आज पर्यंत कुठलीही दखल घेतली नही म्हणून मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. 


 मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या या आंदोलनात महालक्ष्मी नगर येथील समस्त नागरिक मोठ्या संख्येने हाजरी लावली आहे, या आंदोलनात माध्यमांशी बोलताना मानवाधिकार संरक्षण संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सादिक शेख यांनी महापालिका प्रशासनाला अशा इशारा दिला आहे की जोपर्यंत महापालिका दाखल घेत नाही तो पर्यंत हा आंदोलन असाच सुरू राहणार आहे. या आंदोलनात मानव अधिकार संरक्षण संघटनेचे राज्य अध्यक्ष( सामाजिक संरक्षण विभाग ) प्रवीण चांदेकर, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, जिल्हा अध्यक्ष ( आरोग्य विभाग )  अकबर शेख, फयाज मुल्ला, मीर मोहम्मद खान, रफिक मुल्ला, मिनाज इंगळगी, मौलाना आसिफ सय्यद, फरीद खाजा, इरफान मुजावर, सलीम शेख, आबेदा सिकंदर शेख, रेहाना मुल्ला, आयशा सय्यद, अनिसा नदाफ व अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क 

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment