Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, October 8, 2024

SARA NEWS NETWORK

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विश्व परिवर्तन फाउंडेशनच्या वतीने समाजातील विविध क्षेञात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान... 

सोलापूर (प्रतिनिधी) :- विश्व परिवर्तन फाउंडेशन ही भारत सरकार मान्यता प्राप्त संस्था आहे. विश्व परिवर्तन फाउंडेशन नेहमीच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान करत असते. आज या फाउंडेशन कडून विश्व परिवर्तन फाउंडेशन च्या कार्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्यांचा सन्मान व सत्कार सोहळा संपन्न झाला. या मध्ये 




पर्यावरण दुत डॉ मनोज देवकर व वृक्षप्रेमी तथा सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांनी इकोनेचर क्लबच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून सोलापूर जिल्हा व शहरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले यांच्या कार्याची दखल घेऊन सोलापूर महानगरपालिका व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून वसुंधरा पुरस्कार मिळाल्याने विश्व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. 


गोवा येथे बेस्ट आयकॉनिक समाजसेवक  पुरस्कार मिळाल्याबद्दल सादिकभाई नदाफ व डॉ एस के गायकवाड यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. 


 तसेच दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचाही सत्कार विश्व परिवर्तन फाउंडेशन च्या वतीने करण्यात आला. 


  पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष यशवंत पवार यांच्या अध्यक्षते खाली सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सर्व सत्कार मुर्तीना फेटा बांधून शाल व हार देऊन सत्कार करून शुभेच्छा देऊन गौरविण्यात आले. 

 यावेळी विश्व परिवर्तन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेख सर यांनी आपल्या प्रस्तावनात विश्व परिवर्तन फाउंडेशन ची माहिती देऊन शुभेच्छा दिल्या. 


यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबुद्ध भारत निर्माण चळवळीतील पहिला हिंदी चित्रपट खैरलांजी हत्याकांडावर आधारित "पैगाम" या हिंदी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले. 


यावेळी डॉ कीर्तीपाल गायकवाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्बाल शेख, राष्ट्रीय सदस्य बुरहान काजी, प्रदेशाध्यक्ष रफिक बागवान, जिल्हाध्यक्ष अहमद कोतवाल, पत्रकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष युंनुस आतार, जिल्हाध्यक्ष शब्बीर मनियार, शहराध्यक्ष विजयकुमार उघडे, अजमुद्दीन कोरबू ,वहाब शेख आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विजयकुमार उघडे यांनी तर आभार प्रदर्शन कुरेशी यांनी केले. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे




No comments:

Post a Comment