सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोहमार्ग पोलीसांची उत्कृष्ठ कामगीरी;
अपहरण झालेल्या बालकास तीन दिवसात शोधून दिले पालकांचे ताब्यात..
सोलापूर (प्रतिनिधी) :- या मध्ये हकिकत अशी की, सोलपूर लोहमार्ग पोलीस ठाणे गु र नं. ००६/२०२४ कलम १३७ बीएनएस २०२३ दि. १६/१०/२०२४ अन्वयेच्या गुन्हयातील पिडीत बालक नामे ओम सुशांत भोसले वय १७ वर्षे १० महिने राह. अर्बन ग्राम सुर्यनगरी अळूची ता. बारामती जि. पुणे यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणामुळे फुस लावून रेल्वे प्रवासात पळवून घेवून गेला असलेबाबत पिडीत मुलाचे वडील नामे सुशांत पोपट भोसले यांनी समक्ष सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे येवून दिले फिर्यादीवरून गुन्हा दाखल करणेत आला होता. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान गुन्हयातील पिडीत मुलाचे मोबाईलचे लोकेशन ता. वि. शाखा पुणे लोहमार्ग यांचेकडून घेवून त्यांचे मदतीने त्याचे नंबरचे सीडीआर व एसडीआर काढणेत आला होता. तरी त्याचे नंबरचे लोकेशन है पुरी, राज्य ओरीसा येथील दाखवित होते. सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी एम जे गुरव यांचे तोंडी आदेशान्वये तसेच मा. पोलीस अधीक्षक सो पुणे लोहमार्ग यांचे परराज्यात जाणेचे परवानगीने पुरी, राज्य ओरीसा येथे जावून नमुद पिडीत मुलाचे लोकेशन घेवून तेथील स्थानिक पोलीस ठाणेचे मदत घेवून नमुद पिडीत मुलास ताब्यात घेतले. तसेच पिडीत मुलाचे वडीलांना तात्काळ पुरी, राज्य ओरीसा येथे बोलावून घेवून त्यांचेसोबत नमुद पिडीत मुलास सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे घेवून आलो.
सदर गुन्हयाचे तपास हे मा. पोलीस अधीक्षक तुषार दोषी , अपर पोलीस अधीक्षक राहीदास पवार पुणे लोहमार्ग यांचे मार्गदर्शनाखाली सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संतोष बा. गायकवाड, सहा.पोलीस निरीक्षक श्री. एम जे गुरव, पोलीस उपनिरीक्षक श्री. संजय जाधव, साबीर जरतार पो हवा व नं. ६१, प्रमोद सुरवसे पो हवा व नं. ८७, तसेच स्था. गु. अ. शाखा पुणे लोहमार्ग कडील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय ब. वाघमारे, सपोफौ विजय मा. कांबळे यांनी नमुद अपहरण झालेल्या बालकाचे शोध घेण्यात मोलाची कामगरी केली.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment