Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Sunday, September 13, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापूर गुन्हे शाखेचा धडाका.!

 5 गुन्हे उघड, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त, 2 किलो गांजासह 5 सराईत गजाआड..



सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल असलेले मालाविषयक गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मा. पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुन्हे शाखेने मोठी कामगिरी केली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या 4 पथकांनी मिळून घरफोडीचे 02, जबरी चोरीचे 02 आणि मोटार सायकल चोरीचा 01 असे एकूण 05 गुन्हे उघडकीस आणून 16,09,100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच अंमली पदार्थ विरोधी कारवाईत 2 किलो 11 ग्रॅम गांजा आणि एक मोटारसायकल असा 1,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रमुख कारवाया अशा -
1) 2 किलो गांजा जप्त - फौजदार चावडी पोलीस ठाणे
दि. 10/09/2026 रोजी पो.उप.नि. विजय बनसुडे यांचे पथक गस्तीवर असताना नवीवेस पोलीस चौकी ते रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रोडवर जुनी मिल चाळ जवळ दोन इसम काळ्या रंगाच्या Access स्कुटी क्र. MH-13 FE 1473 वर संशयास्पदरित्या जाताना दिसले. पाठलाग करून एकास शिताफीने पकडले, एक पळून गेला.

चौकशीत पकडलेल्या इसमाचे नाव (1) शिवाजी धनु राठोड वय- 60 वर्षे, रा. गणपत तांडा, बक्षी हिप्परगा, सोलापूर असे असून त्याचा साथीदार (2) संतोष राम चव्हाण रा. मुळेगाव तांडा, सोलापूर याचेसह गांजा विक्रीसाठी आल्याचे निष्पन्न झाले. स्कुटीच्या हँडलजवळ कापडी पिशवीत गांजा सदृश्य पदार्थ मिळाला. फॉरेन्सिक व्हॅन पाचारण करून तपासणी केली असता तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. वजन 2 किलो 11 ग्रॅम. याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 699/2026 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8(क), 20(ब), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



2) पुणे ग्रामीण मधील सराईत आरोपीकडून 3 गुन्हे उघड - 12,89,100 रु. चा मुद्देमाल हस्तगत
स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे यांच्या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली की, पुणे ग्रामीण कडील अभिलेखावरील घरफोडी व मोटारसायकल चोरीतील आरोपी यश उर्फ सोन्या ज्ञानेश्वर खलसे वय-22, रा. पाणी फिल्टर जवळ, नाशिक फाटा, लवासा सिटी, पिंपरी पुणे हा सोलापूरात येणार आहे. त्यास ताब्यात घेऊन तपास केला असता त्याचेकडून घरफोडीचे 02 गुन्हे (जेलरोड पो.स्टे. गु.र.नं. 124/2025 व 303/2026) मधील 81 ग्रॅम सोन्याचे व 10 ग्रॅम चांदीचे दागिने व 01 युनिकॉर्न मोटारसायकल चोरीचा गुन्हा (सासवड पो.स्टे. पुणे ग्रामीण गु.र.नं. 416/2026) असे 03 गुन्हे उघडकीस आले.

3) अशोक चौकातील जबरी चोरी उघड - 2,75,000 रु. चा मुद्देमाल हस्तगत
दि. 01/09/2026 रोजी रात्री 11.25 वा. फिर्यादी हे अशोक चौक नजीक पायी जात असताना दोन अनोळखींनी त्यांच्या गळ्यातील 25 ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून नेली होती. जेलरोड पोलीस ठाणे गु.र.नं. 499/2026 भा.न्या.सं. 309(4), 3(5).

स.पो.नि. शैलेश खेडकर व पो.अंमलदार इम्रान जमादार यांनी घटनास्थळ व परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले. सुमारे 8 दिवस, घटनास्थळापासून 200 कि.मी. पर्यंतच्या 168 सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यांची पडताळणी करण्यात आली. त्यावरून आरोपी संघर्ष उत्तम वाघमारे वय-22 रा. मुपो. काठोडा जि. बीड यास परभणी येथून दि. 09/09/2026 रोजी ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशीत त्याचा साथीदार रोहन तुकाराम थोरात रा. काठोडा जि. बीड याचेसह गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यांचेकडून 25 ग्रॅम सोन्याची चैन व 05 ग्रॅम सोन्याचे गणपती पेंडलसह गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले.

4) बझार पोलीस ठाण्यातील मंगळसूत्र चोरी उघड
दि. 16/01/2025 रोजी दुपारी 01:00 वा. महिला किराणा दुकानासमोर उभ्या असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरी केली होती. बझार पोलीस ठाणे गु.र.क्र. 33/2025 भा.न्या.सं. 309(6), 3(5).

स.पो.नि. शंकर धायगुडे व पथकाने सी.सी.टी.व्ही. व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपी (1) अजय संजय पंडीत वय 21 रा. निपाणी वडगाव ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर (2) राहुल माणिक आमराव वय 30 रा. अशोक नगर ता. श्रीरामपूर हे सतत ठावठिकाणा बदलत असल्याने मिळून येत नव्हते. सातत्याने पाठपुरावा करून त्यांना दि. 10/09/2026 रोजी पकडले व जबरी चोरी केलेले मंगळसूत्रातील सोन्याच्या दोन वाट्या किंमत 45,000/- हस्तगत केल्या. दोन्ही आरोपी हे अभिलेखावरील गुन्हेगार आहेत.

अशा प्रकारे गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण 16,09,100/- व 1,90,000/- असा एकूण सुमारे 18 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

या कामगिरीत सहभागी अधिकारी व अंमलदार:
पोलीस आयुक्त श्री. एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. दिलीप पवार, वपोनि अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे, स.पो.नि. शैलेश खेडकर, स.पो.नि. शंकर धायगुडे, पो.उप.नि. विजय बनसुडे व त्यांचे पथकातील विजय वाळके, तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, अभिजित पवार, विनोद रजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, रामा भिंगारे, सुरज पवार, वसिम शेख, वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी, शैलेश बुगड, राजकुमार वाघमारे, अजिंक्य माने, अभिजित धायगुडे, काशिनाथ वाघे, सायबर पो.स्टे. कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, आशिष राठोड व चालक बाळासाहेब काळे, खंडू कांबळे यांनी कामगिरी केली आहे.



No comments:

Post a Comment