सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्हा न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी शाम राजेपांढरे यांची फेरनिवड..
सोलापूर, दि. १४ सप्टेंबर : - सोलापूर जिल्हा न्यायालयीन तृतीय श्रेणी कर्मचारी संघटनेची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली.
या सभेमध्ये विद्यमान कार्यकारिणीची मुदत पुढील सहा महिन्यांकरिता वाढविण्याचा महत्त्वपूर्ण ठराव संमत करण्यात आला असून संघटनेची नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली.
नवनिर्वाचित कार्यकारिणी :
• अध्यक्ष - शाम राजेपांढरे
• उपाध्यक्ष - सदाशिव जाधव
• सचिव - योगीराज पैठणकर
• कोषाध्यक्ष - प्रदिप जमदाडे
• सहसचिव - माऊली डांगे
• सह कोषाध्यक्ष - दीपक कांबळे
• सदस्य - रविंद्र बोराडे
• महिला प्रतिनिधी - हेमा मठपती, रूपाली चव्हाण, तस्लीम मुकेरी, प्रियांका जाधव
तालुका प्रतिनिधी :
सोलापूर - सच्चिदानंद निंबाळकर, पंढरपूर - ज्ञानेश्वर डोईफोडे, पंढरपूर महिला - जस्मीन शेख, बार्शी - एस. एल. यादव, बार्शी महिला - एस. एस. वैद्य, माळशिरस - एस. बी. हुल्ळी, करमाळा - महेश पोतदार, माढा - संजय डुरके, अक्कलकोट - स्वप्नील मोरे, मोहोळ - एम. बी. भडंगे, मंगळवेढा - विजया घंटे, सांगोला - अभिषेक फुले.
सदर सभेमध्ये राज्यातील दुय्यम न्यायालयात कार्यरत कर्मचारी वर्गास मा. उच्च न्यायालयात कार्यरत कर्मचारी वर्गाप्रमाणेच सुधारित वेतनश्रेणी लागू होण्याकरीता जे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे त्याविषयी चर्चा करण्यात आली. तसेच सर्व संघटना मिळून स्नेहसंमेलन आयोजित करणे इ. अन्य विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.
या विशेष सर्वसाधारण सभेस यु.एफ.आर. शेख, रमेश मैसूर, प्रमोद सोनटक्के (अधिक्षक), शामराव वलेकर, ज्ञानेश्वर लिंबोळे, आनंद बमनळ्ळी, अमित खिस्ती (सहा अधीक्षक), जगन्नाथ भास्कर, तस्लीम मुकेरी, अश्विनी कस्सा तसेच तृतीय श्रेणी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन माऊली डांगे तसेच सदाशिव जाधव यांनी केले.


No comments:
Post a Comment