Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Wednesday, September 16, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



 सोलापूर ब्रेकिंग - शहर गुन्हे शाखेकडून जबरी चोरीचा गुन्हा 12 तासात उघड;

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (गुन्हे शाखा) पथकाची दमदार कामगिरी.. 

सोलापूर :- गणेश उत्सवानिमित्त शहरात पेट्रोलिंग सुरु असताना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या 12 तासात उघडकीस आणला आहे.

 दि. 16/09/2026 रोजी पोलीस उप-निरीक्षक विजय बनसुडे व त्यांचे पथक शहरात जबरी चोरी, मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना खात्रीशीर बातमी मिळाली की, जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागील कंपाऊंडच्या भिंतीलगत मार्केट चौकी ते हरिभाई प्रशालेकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर दोन संशयीत इसम काळ्या रंगाच्या MH-13-DF-5334 या युनिकॉर्न मोटारसायकलसह थांबले आहेत.



पथकाने तात्काळ तेथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे -

1) मल्लिनाथ राजशेखर जवळगी, वय 36, व्यवसाय ड्रायव्हर, रा. घर नं. 816, उत्तर कसबा, शेटे वाडा, सोलापूर (मूळ रा. सुलेरजवळगे, ता. अक्कलकोट)

2) नागेश मल्लिनाथ बळते, वय 18 वर्ष 20 दिवस, रा. उत्तर कसबा शेटे वाडा सोलापूर 

यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सोलापूर शहरातील दत्त चौक येथील राजेंद्र ज्वेलर्स दुकानाजवळून पायी चालत जाणाऱ्या एका वयस्कर इसमाचा पाठलाग करून दमदाटी करून त्यांच्याकडील रोख रु. 1,00,000/- असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकलवरून पळून गेल्याची कबुली दिली.


पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून जबरी चोरीस गेलेले रोख रु. 1,00,000/- व गुन्ह्यात वापरलेली 1 लाख रुपये किमतीची युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण 2 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गु.र.नं. 708/2026, भा.न्या.सं. कलम 309(4), 3(5) अन्वये गुन्हा दाखल होता.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहा. पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली PSI विजय बनसुडे व त्यांचे पथक - वाजीद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, शंकर याळगी यांनी केली आहे.




No comments:

Post a Comment