Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, September 10, 2026

SARA NEWS NETWORK


 सारा न्यूज नेटवर्क - 




सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचा उपक्रम

मेरी बी. हार्डिंग अध्यापक महाविद्यालयात इंटेन्सिफाईड IEC अंतर्गत HIV/AIDS जनजागृती व संवेदनशीलता कार्यक्रम संपन्न

सोलापूर, दि. 9 सप्टेंबर 2026 -


सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. राखी माने मॅडम यांच्या आदेशानुसार व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, MSACS व सोलापूर DACO यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी मेरी बी. हार्डिंग अध्यापक महाविद्यालयात HIV/AIDS बाबत इंटेन्सिफाईड IEC महाविद्यालयीन संवेदनीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लोलू सर यांनी विद्यार्थ्यांना HIV/AIDS विषयावर शास्त्रीय व्याख्यान दिले. HIV चा संसर्ग, प्रतिबंधात्मक उपाय, गैरसमज आणि उपचार याबाबत सविस्तर माहिती देऊन समुपदेशन करण्यात आले.


या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. श्रीमती येऊळकर मॅडम, DACO चे Lab Technician मा. योगेश कांबळे, ICTC च्या Lab Technician मा. लोंढे मॅडम, शिक्षिका मा. पौर्णिमा खरात मॅडम, सौ. लोंढे मॅडम, रुही मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमास विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.






No comments:

Post a Comment