Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Tuesday, September 15, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सन्मती ज्ञान प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न


सोलापूर : - सन्मती ज्ञान प्रसारक मंडळाच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या पतसंस्थेची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात पार पडली.


या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. दत्तात्रय कदम हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्री. रमेश यादवाड, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता हाडोळे, श्रीमती रोजमेरी गायकवाड, मुख्याध्यापक श्री. दयानंद तीर्थकर उपस्थित होते.



कार्यक्रमाची सुरुवात पतसंस्थेचे सचिव श्री. रितेश मेहता यांनी प्रास्ताविक करून केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.


या सभेत विविध गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता १० वी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सेवानिवृत्त झालेल्या श्रीमती भांदुर्गे मॅडम यांचाही विशेष सत्कार करून त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



सभेचे वार्षिक अहवाल वाचन श्री. मेहता आर. आर. यांनी केले. अध्यक्षीय मनोगतातून श्री. दत्तात्रय कदम यांनी पतसंस्थेची वाटचाल, आर्थिक स्थिती व भविष्यातील उद्दिष्टांविषयी माहिती दिली. पतसंस्थेच्या उज्वल विकासासाठी विविध विषयांवर सभासदांनी सकारात्मक चर्चा केली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मेहता सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. शेटे सर यांनी मानले. सभेस सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क प्रतिनिधी - प्रा. दत्तात्रय महादेव बनसोडे सर, सोलापूर




No comments:

Post a Comment