सारा न्यूज नेटवर्क -
भक्तिमय वातावरणात के. राज डिजिटल प्रेसमध्ये गणेशोत्सव संपन्न; फोटोग्राफर असोसिएशनकडून महाआरती
सोलापूर (दक्षिण सोलापूर) - प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर येथील के. राज डिजिटल प्रेसमध्ये यंदाही गणेशोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. डिजिटल क्षेत्रातील उत्साहाचे प्रतीक ठरलेल्या या प्रेसमध्ये दक्षिण सोलापूर फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने श्री गणरायाची विधिवत पूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि गणरायाला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर बाप्पाची भव्य महाआरती करण्यात आली. आरतीच्या जयघोषाने संपूर्ण प्रेस परिसर भक्तिमय झाला होता.
या सोहळ्याला फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सोनकंटले, सचिव सागर सपाने, मल्लिकार्जुन काळे, रायप्पा कुंभार, शंकर सोनार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी के. राज डिजिटल प्रेसचे संचालक राजेश कंटकधोंड व शुभम कंटकधोंड यांनी उपस्थित राहून कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला. प्रेसमधील सर्व वृत्तपत्र कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने कार्यालयात चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी जनमानसाच्या सुख, समृद्धी आणि शांतीसाठी गणरायाकडे साकडे घातले.


No comments:
Post a Comment