Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, October 16, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 




पत्रकार कृती समितीच्या वतीने विक्रम खेलबुडे यांचा सन्मान.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :-  सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदाची धुरा गेल्या १३ वर्षांपासून सातत्याने सांभाळणारे आणि पत्रकारांमध्ये विश्वासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ पत्रकार विक्रम खेलबुडे यांची १४ व्यांदा अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पत्रकारिता क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, विविध स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.


या फेरनिवडीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार कृती समितीच्या वतीने विक्रम खेलबुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्या हस्ते त्यांना शाल, मानाची टोपी आणि पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना मिठाई भरवून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, पत्रकारांमध्ये समन्वय राखणे आणि संघटनात्मक कार्याला बळकटी देणे, अशा विविध आघाड्यांवर श्रमिक पत्रकार संघाचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी विक्रम खेलबुडे यांनी गेल्या १३ वर्षांपासून सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वावर व्यक्त करण्यात आलेला विश्वास त्यांच्या १४ व्यांदा झालेल्या फेरनिवडीतून अधोरेखित होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


पत्रकारिता हा केवळ बातम्या देण्याचा व्यवसाय नसून समाजातील प्रश्न मांडण्याचे आणि लोकशाहीतील महत्त्वाच्या घटकाची भूमिका बजावण्याचे माध्यम आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या संघटनांचे महत्त्व अधिक वाढते. विक्रम खेलबुडे यांच्या दीर्घकालीन संघटनात्मक कार्याची दखल घेत पत्रकार कृती समितीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.


या सत्कारप्रसंगी पत्रकार कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे यांच्यासह अशोक ढोणे, डॉ. रामचंद्र हुंडारे, अक्षय बबलाद, अमोल कुलकर्णी, गिरमल्ला गुरव, सिद्धार्थ भडकुंबे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी विक्रम खेलबुडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.




No comments:

Post a Comment