Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Friday, October 16, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



रॅपिडो कंपनीची टू व्हीलर बाईक वाहतुकीसाठी कायमची बंद व्हावी;

 ऑटो रिक्षा संघटनेचे मागणी.. 


सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरामध्ये सुरु असलेल्या अवैधरित्या रॅपिडो कंपनीकडून टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक व्यवसाय करीत आहे. या आशयाचे निवेदन यापूर्वी अनेकदा  जिल्हाधिकारी  व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांचेकडे  केलेला आहे. तरी देखील अवैध वाहतूक सुरु असलेली रॅपिडो कंपनीकडून टू व्हीलर बाईक प्रवासी वाहतूक बंद झालेली नाही. नुकतेच पुण्यामध्ये जिल्हाधिकारी पुणे यांचे मार्फत पुणे शहरात टू व्हीलर बाईक व्यवसाय करण्यास बंदीचे आदेश देण्यात आलेल आहेत. जे पुण्यामध्ये होऊ शकते ते सोलापूर शहरामध्ये का होऊ शकत नाही. सोलापूर शहरात ना कोणतेही मोठे उद्योगधंदे आहे ना मेट्रोसिटी आहे, ना आय.टी. पार्क आहे. सोलापूर शहरात मोठे उद्योग नसल्याने सोलापूरातील तरुणपिढी ही रिक्षा व्यवसायाकडे वळलेली आहे. त्यामध्ये रॅपिडो कंपनीकडून टू व्हीलर बाईक अवैध प्रवासी वाहतूकीमुळे रिक्षा चालकाचे फार मोठे नुकसान होत आहे. 

त्यामुळे जिल्हाधिकारी आपणांस नम्र विनंती आहे की, रॅपिडो कंपनीकडून टू व्हीलर बाईक प्रवासी बेकायदेशीर वाहतूक बंद करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा ऑटोरिक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आतिश शिंदे, सचिव सुनील माने, जिल्हा सचिव गजानंद लोणार, तानाजी मसलकर, विशाल लोंढे, दादाराव डुरके, महीपती पवार आदी रिक्षाचालकांनी केलेली आहे.




No comments:

Post a Comment