Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, July 18, 2026

SARA NEWS NETWORK


सारा न्यूज नेटवर्क - 

 अक्कलकोटची ही पवित्र भूमी म्हणजे श्रद्धेचे आणि शांततेचे केंद्र आहे - केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक 

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन

आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे स्वागत.. 


अक्कलकोट (श्रीशैल गवंडी,  दि.१८/०७/२६)

           येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व्यवस्थापनाने भाविकांसाठी केलेल्या सुविधा खरोखरच कौतुकास्पद आहेत. स्वामींच्या आशीर्वादाने हे देवस्थान आणखी मोठे व्हावे हीच प्रार्थना आहे, कारण अक्कलकोटची ही पवित्र भूमी म्हणजे श्रद्धेचे आणि शांततेचे केंद्र आहे असे मनोगत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी

व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी

दर्शनानंतर मंदिर परिसराची पाहणी करून चेअरमन महेश इंगळे यांच्याकडून देवस्थानच्या विविध विकास कामांबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक बोलत होते.



      प्रारंभी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी स्वागत केले. दर्शनानंतर देवस्थान समितीच्या वतीने चेअरमन व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी शाल, श्रीफळ, स्वामींची मूर्ती आणि कृपावस्त्र देऊन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा यथोचित सत्कार केला.

यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी तसेच देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, प्रथमेश इंगळे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, विपूल जाधव आदींसह भाविक उपस्थित होते.


फोटो ओळ - श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करताना चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे, आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलनदादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.




No comments:

Post a Comment