सारा न्यूज नेटवर्क -
"ॲट्रॉसिटीचा" गुन्हा दाखल..!
जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण,करणाऱ्या ५ जणांवर मंद्रूप पोलिसात "ॲट्रॉसिटीचा" गुन्हा दाखल.
प्रतिनिधी : दक्षिण सोलापूर
कुडल ( तालुका दक्षिण सोलापूर) येथे एका मागासवर्गीय व्यक्तीला मारुती मंदिराजवळ कट्ट्यावर बसल्याच्या कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली.
याप्रकरणी पाच जणांविरुद्ध अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
संगप्पा गुरुशांत पाटील, शांतप्पा गुरुशांत पाटील, केदार शांतप्पा पाटील, संगमेश्वर रामचंद्र बगले व बसवराज रामचंद्र बगले सर्वजण राहणार कुडल (ता. दक्षिण सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबतची हकीकत अशी की, फिर्यादी निजलिंगप्पा सूर्यवंशी राहणार कुडल ट्रक चालक म्हणून काम करतात. १२ जुलै रोजी दुपारी साडेचार वाजता, गावातील मारुती मंदिराजवळ असलेल्या कट्ट्यावर ते बसले होते. तेव्हा वरील आरोपींनी फिर्यादी सूर्यवंशी याला तु येथे कट्ट्यावर का बसलास. तुला येथे बसण्याचा अधिकार नाही, असे म्हणून त्याच्या जातीचा उल्लेख करून शिवीगाळ केली. त्यानंतर तो तिथून उठून आपल्या घरी गेला.
त्यानंतर पुन्हा घरासमोरील पठांगणात येवून पाच जणांनी त्याला शिवीगाळ करून लाथ्या बुक्क्यांनी व चप्पलने मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या नाका तोंडातून रक्त आले. त्यावेळी त्याला सोडवण्यासाठी मधी पडलेल्या त्याच्या आईलाही शिवीगाळ करुन मारहाण केली.
त्यानंतर सूर्यवंशी यांनी मंद्रुप पोलीस ठाण्यात येऊन वरील पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप करीत आहेत.

No comments:
Post a Comment