सारा न्यूज नेटवर्क -
कष्टकऱ्यांच्या विचारांचा जागर..!
ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भावपूर्ण अभिवादन..
सोलापूर :- येथील मातोश्री गिरीजाबाई ढोबळे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वासंती पांढरे मॅडम यांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली आणि नॅक समन्वयक प्रा. रेश्मा जाधव मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री. दसाडे सर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी बोलताना, शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेचे प्रश्न आपल्या परखड साहित्यातून मांडणारे, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आपल्या डफावरील थापेने अवघ्या महाराष्ट्राला जागे करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करण्यात आला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.



No comments:
Post a Comment