Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, July 18, 2026

SARA NEWS NETWORK



सारा न्यूज नेटवर्क - 

अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक गावाची शान..!

जानकर बंधूंचे NEET परीक्षेत दैदिप्यमान यश.. 


अक्कलकोट (तालुका प्रतिनिधी) :-


अक्कलकोट तालुक्यातील बादोले बुद्रुक येथील जानकर बंधूंनी नुकत्याच जाहीर झालेल्या NEET परीक्षेत घवघवीत यश संपादन करून गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.


बादोले बुद्रुक येथील सर्वसामान्य गरीब कुटुंबातील समर्थ सुभाष जानकर याने ५२० गुण तर श्रीकांत सुभाष जानकर याने ५६३ गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात अनेक अडचणींवर मात करत एकाच घरातील दोन सख्ख्या भावांनी एकाच वेळी NEET सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवण्याची किमया करून दाखवली आहे.


या दोन्ही भावांच्या यशामुळे बादोले बुद्रुक गावाचे नाव संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात झळकले असून गावकऱ्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवून जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि वेळेचे नियोजन यांच्या जोरावर हे यश मिळवल्याचे दोन्ही भावांनी सांगितले. यशानंतर त्यांच्या आई-वडिलांना अत्यानंद झाला आहे.


यावेळी बोलताना समर्थ व श्रीकांत जानकर म्हणाले, "कठोर परिश्रम, ध्येय आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आजच्या तरुणांनी मोबाईलमध्ये वेळ वाया न घालवता शिक्षणावर लक्ष केंद्रित करून आपल्या आई-वडिलांचे आणि कुटुंबाचे नाव मोठे करावे."

त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




No comments:

Post a Comment