सारा न्यूज नेटवर्क -
सोलापुरात चर्मकार समाज जनजागृती सभेचे आयोजन;
आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध
सोलापूर, दि. 16 जुलै: अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणास विरोध दर्शवण्यासाठी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, सोलापूर यांच्या माध्यमातून भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून चर्मकार समाज जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, या जनजागृती सभेला सर्व समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अनुसूचित जातीतील सर्वच प्रमुख मान्यवरांनी सदर सभेस उपस्थित राहून जनजागृती कार्यास सहकार्य करावे ही नम्र विनंती करण्यात आली आहे.
सभेचा दिनांक व वेळ:
शनिवार, 18 जुलै 2026, दुपारी 04:00 वाजता
स्थळ: चर्मकार समाज विकास मंडळ सोलापूरचे संपर्क कार्यालय, रुबी नगर, (बालाजी मंगल कार्यालय समोरील रस्ता), जुळे सोलापूर.
या सभेचे आयोजन समस्त चर्मकार समाज, जिल्हा सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वांना क्रांतिकारी जयभीम.!


No comments:
Post a Comment