Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, August 20, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्वागताध्यक्षपदी नगरसेवक

महेश इंगळेंची निवड.


अक्कलकोट (श्रीशैल गवंडी, दि.२०/०८/२६) :-

        महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुणे येथे पुढील वर्षी २८ ते ३१ जानेवारी २०२७ अखेर होणाऱ्या १०० व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यभरात ९९ नांदी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येणार आहेत. त्यापैकी ग्रंथपाल नांदी साहित्य संमेलन अक्कलकोट येथे येत्या २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महेश इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

 महाराष्ट्र साहित्य परिषद, अक्कलकोट शाखेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली असल्याची माहिती शाखेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांनी दिली. 

महेश इंगळे हे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असून विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी नगराध्यक्ष पदाची जबाबदारीही सांभाळली आहे. विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे.

 त्यांच्या निवडीबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी आणि स्विमींग ग्रुपचे अप्पू मालक पराणे, ओंकारेश्वर उटगे, विद्याधर गुरव, विश्वनाथ देवरमनी, मनोज जगताप, कुमार हतुरे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, श्रीमंत खसगी, सचिन किरनळ्ळी, सिद्धराम बिडवे, माशाळे साहेब, सुरेश शटगार, संतोष जवळगे सर, दत्ता कटारे, श्रीशैल गवंडी, तुषार मोरे, अंकुश केत, रमेश शिंदे आदीसह देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, चंद्रकांत गवंडी आदींसह नागरिकांनी नगरसेवक महेश इंगळे यांचे अभिनंदन केले आहे.




No comments:

Post a Comment