सारा न्यूज नेटवर्क -
मार्डीगावची लेक सुवर्णा झाडे-खेलबुडे यांचा ५ वर्षांपासून अनोखा उपक्रम;
नागपंचमी निमित्त १००० महिलांना लाह्या आणि मेंदी कोनचे वाटप..
मार्डीकर (प्रतिनिधी) :- सालाबादप्रमाणे यंदाही नागपंचमीच्या पावन सणाचे औचित्य साधून मारडी गावची लेक आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. सुवर्णा झाडे-खेलबुडे यांनी सामाजिक आणि धार्मिक कार्याचा अनोखा संगम घालत गावातील महिलांसाठी मेंदी कोन आणि नागदेवतेचा प्रसाद म्हणून लाह्यांचे पाकीट वाटप केले.
गेल्या ५ वर्षांपासून अविरतपणे त्या हा उपक्रम राबवत आहेत. मार्डीगावची लेक या नात्याने गावातील आपल्या भगिनी, वहिनी, लहान मुली, आजी, मावशी, काकी अशा सर्व नात्यांतील महिलांपर्यंत मनापासून आनंदाने आणि आवडीने हा प्रसाद पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
यंदा सुमारे १००० लाह्या पाकीट आणि मेंदी कोन चे मार्डीतील जास्तीत जास्त महिलांना करण्यात आले. केवळ भेटवस्तू म्हणून नव्हे, तर महिलांनी सामाजिक व धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हावे, हा यामागचा हेतू असल्याचे सुवर्णा ताई यांनी सांगितले.
"नागपंचमीचा प्रसाद नागराजाला श्रद्धेने दिला जातो, ती परंपरा अशीच पुढे चालत राहावी या उद्देशाने हे छोटंसं सामाजिक कार्य मी गेल्या ५ वर्षांपासून करत आहे. मार्डी गावची लेक म्हणून माझ्या सर्व बहिणींना नागपंचमीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा," अशा भावना सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा झाडे-खेलबुडे यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या या सातत्यपूर्ण आणि कौतुकास्पद उपक्रमाचे गावात सर्वत्र कौतुक होत आहे.



No comments:
Post a Comment