Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Thursday, August 20, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



सोलापुरातील २८ पैकी २३ पोलिस चौक्या पुन्हा सुरू

 बीट मार्शलसह  चार अंमलदार चौकीत असणार;  

पोलीस मित्र सोशल फौंडेशन च्या पाठपुराव्याला अखेर यश 


सोलापूर (प्रतिनिधी ) :- शहरात सात पोलिस ठाणे आहेत नागरिकांच्या सोयीसाठी पोलिस ठाण्याअंतर्गत २८ पोलिस चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. मात्र, तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चौक्यांमधून चालणारे कामकाज बंद केले होते. 


 सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौक्या सुरू करणे बाबत पोलीस मित्र सोशल फाउंडेशन वतीने सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार तसेच जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त पुणे यांना निवेदन सादर करून बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौक्या सुरू करणे बाबत  सातत्याने पाठपुरावा केला होता  याबाबत विभागीय आयुक्त पुणे यांनी पोलीस मित्र सोशल फाउंडेशनच्या निवेदनाची दखल घेऊन  सोलापूर शहरातील बंद असलेल्या पोलीस चौकी सुरू करणे बाबत पोलीस आयुक्त यांना पत्र देखील दिले होते.

पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी अखेर बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौक्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या २३ चौक्या सुरू करण्यात आल्या असून तेथे आता बीट मार्शलसह एकूण चार ते सहा अंमलदार असतील 

सोलापूर शहरात चोरी, घरफोडी, दुचाकी चोरी असे गुन्हे अन्य गुन्ह्यांच्या तुलनेत अधिक घडतात. दुसरीकडे रस्त्यांवर शिवीगाळ दमदाटी 

हाणामारीचेही प्रकार होतात. याशिवाय कौटुंबिक या पार्श्वभूमीवर नागरिकांना आता तत्काळ पोलिसांची मदत मिळावी, या हेतूने 


पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी बंद पडलेल्या पोलिस चौक्या पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे फौजदार

चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मार्केट (होम मैदानाजवळील ) चौकी, सम्राट चौकी एमआयडीसी पोलीस चौकीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याशिवाय अन्य २० पोलिस चौक्या देखील सुरू आहेत. त्याठिकाणी नियमित पोलिस अंमलदार असतील, अडचणीतील नागरिकांना आता तेथून पोलिसांची मदत घेता येणार आहे.

*'एफआयआर' पोलिस ठाण्यातच*


पोलिस चौक्या नागरिकांच्या मदतीसाठी व सोयीसाठी असणार आहेत. अडचणीतील नागरिकांनी 'डायल ११२' वर कॉल करून मदत मागितल्यानंतर काही मिनिटात त्यांना पोलिसांची मदत मिळू शकणार आहे. पण, गुन्हा तथा 'एफआयआर'ची नोंद पोलिस ठाण्यातच होईल. गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिकांना संबंधित पोलिस ठाण्यातच यावे लागणार आहे. पोलिस चौक्यांमध्ये  आता सीसीटीव्ही देखील बसविले जाणार आहेत 

या परिसरात अंमलदार नियमित गस्त देखील घालतील. दरम्यान, फौजदार चावडी कसबा व आयुर्वेद पोलिस चौकी, जोडभावी पेठ पोलिस ठाण्याअंतर्गत शेळगी आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याअंतर्गत असलेली रामवाडी, या पोलिस चौक्याही काही दिवसांत सुरू होणार आहेत.


पोलीस आयुक्तालयातील २८ पैकी २५ पोलिस चौक्या सुरू आहेत. उर्वरित पाच चौक्या पुन्हा सुरू करण्याची प्रक्रिया आहे. या ठिकाणी नागरिकांना सहजपणे पोलिसांची मदत  मिळेल. पोलिसांची त्या परिसरात गस्त राहील, जेणेकरून गुन्हे घडणार नाहीत. सोलापूर शहरातील बंद अवस्थेत असलेल्या पोलीस चौक्या सुरू करण्याचा निर्णय पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी घेतल्याने पोलीस मित्र सोशल फाउंडेशन वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचे आभार  मानले आहेत.

No comments:

Post a Comment