Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Saturday, October 17, 2026

SARA NEWS NETWORK

सारा न्यूज नेटवर्क - 



जेलरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई.!

बालाजी चौकात २४० लिटर हातभट्टी दारू जप्त; एकजण ताब्यात १.१४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत..

सोलापूर (प्रतिनिधी) :- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आली असताना जेलरोड पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने धडाकेबाज कारवाई केली आहे. बालाजी चौक परिसरात दुचाकीवरून संशयास्पदरीत्या हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत २४० लिटर हातभट्टी दारू आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी, असा एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी प्रभातगस्त घालत होते. यावेळी बालाजी चौक परिसरात सुझुकी अॅक्सेस दुचाकीवरून संशयास्पदरीत्या तीन रबरी ट्यूबमध्ये भरून हातभट्टी दारूची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित व्यक्तीची चौकशी केली असता, त्याचे नाव नागनाथ शंकर पवार (वय ४९, रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) असे असल्याचे समोर आले.


२४० लिटर हातभट्टी दारूसह दुचाकी जप्त

पोलिसांनी केलेल्या तपासणीत तीन रबरी ट्यूबमध्ये प्रत्येकी ८० लिटर याप्रमाणे एकूण २४० लिटर हातभट्टी दारू आढळून आली. या दारूची किंमत २४ हजार रुपये असून, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या सुझुकी अॅक्सेस दुचाकीची अंदाजे किंमत ९० हजार रुपये आहे. अशा प्रकारे एकूण १ लाख १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गावडे करीत आहेत.


वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई


ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील पोलीस निरीक्षक जयदीप केळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील पोलीस हवालदार गावडे, पोलीस कॉन्स्टेबल उमेश सावंत, पोलीस कॉन्स्टेबल जाधव आणि पोलीस कॉन्स्टेबल व्हनगुंटी यांनी सहभाग घेतला.




No comments:

Post a Comment