Sara News Network

मुख्य संपादक - डॉ.राम हुंडारे

Monday, October 19, 2026

SARA NEWS NETWORK

 सारा न्यूज नेटवर्क - 



जेऊरवाडीचे उपसरपंच रोहित भालेराव हे ‘समाजकार्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित

पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने शिर्डी येथे गौरव सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत सामाजिक कार्याचा गौरव


शिर्डी :- सामाजिक कार्य, लोकसेवा आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य (Electronic & Social Media) यांच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात जेऊरवाडी, ता. अक्कलकोट येथील उपसरपंच रोहित दत्तू भालेराव यांना प्रतिष्ठेचा ‘समाजकार्य भूषण’ पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यामुळे जेऊरवाडी आणि अक्कलकोट परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामनाथ जऱ्हाड, अमित देवकुळे,सुर्यकांत पाडे अयोध्या ,घूले अण्णा इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष नारायण ढेपे, उपाध्यक्ष  विजयकुमार लोंढे तसेच , विकास भडकवाड राज्य राज्य संघटक  ,गणेश खेमकर राज्य चिटणीस,सचिन उपाध्ये राज्य खजिनदार, अशपाक शेख ,यांची प्रमुख उपस्थिती होती. 


रोहित दत्तू भालेराव हे जेऊरवाडीचे उपसरपंच म्हणून कार्यरत असून, सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. समाजातील विविध घटकांच्या समस्या समजून घेणे, लोकहिताच्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तींच्या कार्याला सन्मान मिळवून देणे, ही काळाची गरज आहे. अशा व्यक्तींच्या कार्याचा गौरव केल्याने समाजात सकारात्मक विचारांची रुजवण होते आणि नव्या पिढीला समाजसेवेची प्रेरणा मिळते.


पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने सामाजिक कार्य, लोकसेवा आणि जनजागृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले जाते. यानिमित्ताने रोहित भालेराव यांना मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या कार्याची दखल घेणारा आणि भविष्यातील सामाजिक वाटचालीस प्रेरणा देणारा ठरला आहे.

या सन्मानाबद्दल जेऊरवाडी तसेच अक्कलकोट परिसरातून रोहित दत्तू भालेराव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

या कार्यक्रमाला अरुण साळुंके, गजानन लोणार, नामदेव राठोड, विरेंद्र कांबळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.


पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य (Electronic & Social Media) यांच्या या उपक्रमाचे सामाजिक स्तरातून कौतुक होत असून, समाजासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची ही परंपरा समाजहिताच्या कार्याला नवी दिशा देणारी ठरत आहे.

— पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य (Electronic & Social Media)

No comments:

Post a Comment