सारा न्यूज नेटवर्क -
त्यागमूर्ती माता रमाई यांची 126वी जयंती उत्साहात साजरी... सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, विजय चव्हाण यांच्या वतीने विनम्र अभिवादन..
सोलापूर (प्रतिनिधी) :- त्यागालाही वाटावी लाज, असा माई तुझा त्याग,तुझ्या त्यागानेच निर्माण झाला, आम्हा लेकरांचा अभिमान...
त्याग मूर्ती माता रमाई यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम..
स्वतः झिजून सर्वांना मायेची साऊली देणाऱ्या त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२६ जयंतीनिमित्त आंबेडकर चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सवात पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे आणि मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राज्य उपप्रमुख(बांधकाम कामगार विभाग) विजय चव्हाण यांच्या कडून माता रमाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्धवंदना म्हणून विनम्र अभिवादन करण्यात आले.
माता रमाईंनी स्वतःचा व मुलांचा विचार न करता बाबासाहेब आंबेडकर यांना भक्कम साथ आणि पाठबळ दिले, म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्रीशक्तीसाठी प्रेरणादायी आहे, म्हणूनच त्यांना त्यागमूर्ती माता रमाई म्हणतात असे प्रतिपादन पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment