सारा न्यूज नेटवर्क -
ह.दे. प्रशालेचे माजी विद्यार्थी कर्नल श्री.विनायक तांबेकर यांनी दिली संगणकाची भेट..
सोलापूर (प्रतिनिधी) :- हरिभाई देवकरण प्रशाला सोलापूर येथे आज माजी विद्यार्थी कर्नल श्री विनायक तांबेकर यांनी भेट दिली. शाळा समिती अध्यक्ष मा. श्री. राजेशजी पटवर्धन सर व ह.दे. प्रशाला तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. प्रकाश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी विद्यार्थ्यांने प्रशालेस वीस संगणकाची भेट दिली.
हा कार्यक्रम संगणकाच्या प्रमुख दालनामध्ये संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी 1957 च्या बॅचचे कर्नल श्री. विनायक तांबेकर हे होते. त्यांच्या हस्ते संगणक दालनाचे नूतनीकरण व उद्घाटन करण्यात आले.
कर्नल श्री. विनायक तांबेकर यांचा सत्कार मा. श्री. राजेश पटवर्धन सर यांनी केला. मा.श्री. राजेशजी पटवर्धन सर यांनी आपल्या मनोगतातून कर्नल तांबेकर यांनी वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या शाळेची आठवण ठेवून त्यांनी शाळेला संगणकाची भेट दिली त्याबद्दल शाळेकडून व संस्थेकडून श्री कर्नल तांबेकर यांचे आभार मानले.
कर्नल श्री. तांबेकर सरांनी शाळेबद्दल असणारे प्रेम व विद्यार्थ्यांप्रती असणारा जिव्हाळा, विद्यार्थी हेच उद्या देश घडवणार आहेत असे सांगितले व एन. डी. ए. मध्ये सैन्य दलात जाण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा व प्रशिक्षण असते याबद्दल माहिती दिली व विद्यार्थ्यांशी संवादही साधला.
मा. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून 1957 साली शिकत असलेले श्री .कर्नल तांबेकरांनी शाळेप्रती असणारे प्रेम व आपुलकी व बदलत्या जगाबरोबर तंत्रज्ञानाच्या युगात उच्च दर्जाचे शिक्षण आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळावे या भावनेतून आपल्या शाळेला संगणक भेट दिलेले आहेत. याचा उपयोग आपले विद्यार्थी करून त्यांची गुणवत्ता वाढवतील अशी ग्वाही देऊन श्री. तांबेकर सरांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री मोतीबने सर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम प्रसंगी सर्व पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment