Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 27, 2024

उपोषण व आंदोलनासाठी पर्यायी जागा द्या . संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

 


सारा न्यूज नेटवर्क - 

उपोषण व आंदोलनासाठी पर्यायी जागा द्या .

संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!. 

सोलापूर( प्रतिनिधी) :- आपल्या विविध मागण्यासाठी नागरिक विविध संघटना व राजकीय पक्षाच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय जवळील जिल्हा परिषदेचे  छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे वेगवेगळी उपोषण व आंदोलने केली जातात त्यामुळे या भागाला उपोषण गेट म्हणून ही ओळखले जाते पण सध्या हे उपोषण गेट दोन्हीही बाजूस अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहे. या ठिकाणी अनेक छोटी-मोठी नवीन खोकी धारकांनी अतिक्रमण केलेले आहे त्यामुळे जागे अभावी उपोषणकर्त्यांना व आंदोलकांना याचा त्रास होत आहे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध संघटनेच्या वतीने तेथे उपोषण आंदोलने केली जातात एकाच वेळी त्या ठिकाणी वेगवेगळी उपोषण व आंदोलने असल्यास जागा अपुरी पडत आहे त्यातच काही मोठे मोर्चे आंदोलन असेल तर इतर उपोषणकर्त्यांना जागा मिळत नाही त्यामुळे सध्या जिल्हाधिकारी कार्यालय व काही महत्त्वाचे शासकीय कार्यालय सात रस्ता येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्थलांतरित झालेले आहे. 

त्यामुळे सात रस्ता येथे नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण व आंदोलनाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके रमेश चव्हाण रुपेश किरसावंगी रवी शिरगिरे वैभव धुमाळ आकाश चव्हाण मल्लिनाथ शेवगार शेखर स्वामी राजेंद्र माने आधी उपस्थित होते

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment