सारा न्यूज नेटवर्क -
साप्ताहिक कार्यसम्राटचे पत्रकार विकास काळे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी):- गेली नऊ वर्षापासून पत्रकारिता एक वसा चळवळ म्हणून राजकीय सामाजिक शैक्षणिक व इतर बातम्या आपल्या दर्शकापर्यंत पोहोचण्याचा काम साप्ताहिक कार्यसम्राट ने आज आजतागायत केल असून वंचित पीडित अन्यायग्रस्त अत्याचार ग्रस्त लोकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली आहे पत्रकारिता केवळ व्यवसाय नसून एक सामाजिक बांधिलकी म्हणून साप्ताहिक कार्यसम्राट ने सोलापूर शहर जिल्ह्यात आपले आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी प्रशासन दरबारात नेहमीच आवाज उठवणाऱ्या साप्ताहिक कार्यसम्राटच्या सोलापूर शहर प्रतिनिधी विकास काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते पत्रकार विकास काळे शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार दैनिक शिव निर्णय चे संपादक अनिल शिराळकर पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद इम्पॉर्टन्ट न्यूज चे संपादक श्रीनिवास बनसोडे साप्ताहिक यश बॉस चे संपादक बाशाभाई शेख सुरेंद्र जाधव महेश गायकवाड सादिक मुजवार इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment