Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 25, 2024

गुरववाडी ता.अक्कलकोटचे सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सव सोलापूर येथे उत्साहात प्रारंभ.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

गुरववाडी ता.अक्कलकोटचे सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ६४७ वी जयंती सोलापूर मध्ये उत्साहात प्रारंभ. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे. संत रोहिदास महाराज यांच्या ६४७ वी जयंतीचे औचित्य साधुन सर्व समाज बांधवांच्या वतीने गुरववाडी ता.अक्कलकोट येथील सरपंच माळप्पा पुजारी यांच्या हस्ते श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला गुलाब पुष्प अर्पण करून दिपप्रज्वलीत करून प्रातिमेचे पूजन करण्यात आले. 


संत रोहिदास महाराज यांच्या बद्दल बोलताना सरपंच माळप्पा पुजारी म्हणाले की, संत रोहिदास महाराज भारतभर फिरून त्यांनी महान कार्य केल्यामुळे ते जाणले जातात ते सुधारक संतांमध्ये अग्रणी होते. त्यांनी कुलभूषण कवी होते तसेच तत्कालीन प्रचलित सामाजिक विद्वान होते. त्यांनी लक्षणीय योगदान केले. त्यांच्या गुरुग्रंथ साहिबमध्ये असलेल्या रचना आजही लोकप्रिय आहेत.

संत रोहिदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते. 

यावेळी माळप्पा पुजारी यांनी संस्थाअध्यक्ष संतोष दादा गायकवाड व सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्याशी विवीध सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली. संस्था करत असलेल्या कार्याची माहिती घेतली. 




 या प्रसंगी जीके संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोषदादा गायकवाड, पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, प्रशासकीय अधिकारी खडतरे, राहुल निम्मल, वैभव डांबरे व इतर समाज बांधव उपस्थित होते.


सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment