सारा न्यूज नेटवर्क -
मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष (महिला विभाग ) पदावर अनिता राठोड यांची नियुक्ती..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहर व जिल्ह्यातील महिलांच्या अनेक विषयावर शासन दरबारी न्याय मिळवून देण्याकरिता व तसेच आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून अनेक दिवसांपासून काम करणारे अनिता राठोड यांची मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष (महिला विभाग) पदी नियुक्ती करण्यात आली.
लैला ताई जमादार यांच्या हस्ते अनिता राठोड यांना शाल व पुष्पगुच्छ ओळखपत्र देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला.
त्यावेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे संस्थापक व प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष (आरोग्य विभाग) अकबर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष (आरोग्य विभाग )प्रवीण चांदेकर, सारा न्यूज नेटवर्क चे संपादक राम हुंडारे, कॉन्ट्रॅक्टर इंजीनिअर रवी रणदिवे, तोताबाई पवार, आदित्य दत्ता , शैलेंद्र राठोड, नागेश बगाडे, परिवर्तन फाउंडेशन महिला जिल्हाध्यक्ष लैला जमादार व अनेक मान्यवर उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment