Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, February 24, 2024

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा ६४७ वा जयंती उत्सव सात रस्ता सोलापूर येथे उत्साहात प्रारंभ.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या ६४७ वा जयंती उत्सव सात रस्ता सोलापूर येथे उत्साहात प्रारंभ.

सोलापूर (प्रतिनिधी) : अनिष्ट प्रथा आणि रूढीला विरोध करणारे संत रोहिदास महाराज यांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात आणि विविध उपक्रमाने साजरी करण्यात येत आहे.


ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड यांच्या हस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवराज दादा गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. 




 सोलापुरात सात रस्ता संगमेश्वर कॉलेज कॉर्नर इथं GK मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था प्रणित संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शुक्रवारी २३/०२/२०२४ रोजी पत्रकार सुरक्षा समितीचे शहर अध्यक्ष व सारा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक राम हुंडारे यांच्या हस्ते संत रविदास महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना व पूजन  करण्यात आले.


अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडी येथील सरपंच माळप्पा पुजारी यांनी संत रोहिदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमास उपस्थित राहुन संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले. 

यावर्षी संत रोहिदास महाराज यांची 647 वी जयंती उत्सव आहे.

यावेळी जीके मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, विष्णू कांबळे, श्री चव्हाण, डांबरे वैभव, महेश उंबरगीकर, विजय चव्हाण, आकाश कणकी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment