Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, February 10, 2024

सोलापूरच्या सिविल हॉस्पिटल मध्ये पेशंटांना होणारा त्रास तात्काळ बंद करा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

सोलापूरच्या सिविल हॉस्पिटल मध्ये पेशंटांना होणारा त्रास तात्काळ बंद करा.

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापुरात प्रसिद्ध असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोउपचार उपचार रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गरीब,पीडित, वंचित नागरिक उपचारासाठी दूर दूर ठिकाणयातून एक आशाने येतात. परंतु सिविल हॉस्पिटल मध्ये  सध्या अशी परिस्थिती आहे की अनेक रुग्णांना गोळ्या औषध डॉक्टरांकडून लिहून दिल्यानंतर हॉस्पिटलमध्ये अर्धे गोळ्या दिले जातात आणि अर्धे गोळ्या बाहेरून घ्या अशा पद्धतीने उत्तरे मिळतात, दुसरीकडे एक्स-रे फोटो काढण्यासाठी गेलेल्या पेशंटांना अशा पद्धतीने म्हटले जातात की तुमचा एक्स-रे चा फोटो तुमच्या स्मार्टफोन मध्ये घ्या एक्स-रे काढल्यानंतर त्याची प्रिंट तिथे देत नाही.सोलापुरात बाहेरून गोरगरीब नागरिक उपचारासाठी येतात परंतु डॉक्टरांकडून त्या पेशंटला लवकर उपचार मिळत नाही अनेक पेशंटचे हात, पाय तुटल्यानंतर त्या पेशंटांना  प्लास्टर टाकल्यावर ते प्लास्टर तुम्ही स्वतः बाहेर काढून घ्या अशी उत्तरे डॉक्टरांकडून  मिळत आहे. 17 नंबर तातडीची सेवा मध्ये अपघात झालेले पेशंट गंभीर दुखापत झालेले पेशंटला लवकर उपचार मिळत नाही तात्काळ उपचार न मिळाल्याने अनेक पेशंटचा मृत्यू झाला आहे. त्यासाठी या सर्व विषय वर एक समिती जिल्हाधिकारी  कार्यालयाकडून नेमणूक करून सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये  पेशंटांना होणारा त्रास तात्काळ दूर करण्यात यावा म्हणून मानव अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

 त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सादिक शेख, प्रदेश उपाध्यक्ष दुर्योधन भडकुंबे, प्रदेश संघटक श्रीकांत कोळी, राज्य उपप्रमुख ( बांधकाम कामगार विभाग ) विजयकुमार चव्हाण, जिल्हाध्यक्ष (आरोग्य विभाग ) अकबर शेख, जिल्हा कार्याध्यक्ष (आरोग्य विभाग) परविन चांदेकर, सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे,  जिल्हा अध्यक्ष( महिला विभाग) नागमणी वग्गू, पत्रकार नागनाथ गणपा अनेक मान्यवर उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment