सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांची सदिच्छा भेट..
दिले संत रविदास महाराज यांच्या जयंती उत्सवाचे निमंत्रण..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूरचे नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी मावळते पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या कडून नुकताच पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.
आज त्यांची पोलीस आयुक्तालय सोलापूर येथे सदिच्छा भेट घेतली. आणि त्यांना पुढील कारकीर्द हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी त्यांना संत रविदास महाराज जयंती उत्सव सात रस्ता सोलापूर येथे पार पडणारऱ्यां जयंती उत्साहात सहभागी होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले.
यावेळी GK संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड, पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर अध्यक्ष तथा सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे, उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, मानवाधिकार संरक्षण संघटनेचे राज्य उपप्रमुख विजय चव्हाण उपस्थित होते.
सारा न्यूजचे संपादक राम हुंडारे यांच्याशी बातचीत ..
पोलीस आयुक्त एम.राजकुमार सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्याशी बोलताना म्हणाले की, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याबरोबरच महिला सुरक्षेबरोबरच पोलीस आणि सामान्य माणूस यांच्यातील अंतर कमी करण्यावर आपला भर राहील, असं नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले.
सर्वसामान्य जनतेच्या मनात पोलिसाबद्दल आकस वा द्वेष निर्माण न होता विश्वासाचा भाव निर्माण व्हावा, माझं शहर सुरक्षित आहे, या शहरात मी सुरक्षित आहे, असा आत्मविश्वास सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण होईल, या दृष्टीकोनातून सर्वसामान्य माणूस केंद्रीत ठेऊन काम करण्याचा प्रयत्न करणार आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment