सारा न्यूज नेटवर्क -
संत रोहिदास महाराज जयंती निमित्त प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापना उत्सव..
माळशिरस (प्रतिनिधी) :- संत रोहिदास महाराज यांची 647 वी जयंती वेळापूर माळशिरस येथे साजरी करण्यात येत आहे. त्यासाठी उत्सव प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापना वार शुक्रवार दिनांक 23 /2/ 2024 रोजी वेळापूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे सौ सुरेखा अशोक लाबतुरे मॅडम यांची
प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळेस श्री राजाभाऊ शिंदे संस्थापक श्री संत गुरु रविदास महाराज मंदिर भुईंज,
श्री गणेश कांबळे संस्थापक अध्यक्ष संत रोहिदास मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था,
श्री मधुकर गवळी प्रदेश महासचिव,
श्री मिलिंद सरतापे आर पी आय अध्यक्ष माळशिरस,
बाळासाहेब राऊत शहरअध्यक्ष सोलापूर,
संजय खरतडे मा तहसीलदार सांगोला
संतोष खरतडे सांगोला,
कैलास सुरवसे ग्राम विकास अधिकारी वेळापूर,
रजनिश सरपंच वेळापूर,
यावेळी विनोद भगत यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आयोजन समस्त चर्मकार समाज वेळापूर यांनी केले.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment