सारा न्यूज नेटवर्क -
परिवर्तन फाउंडेशन च्या कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा..
सोलापूर (प्रतिनिधी) :- परिवर्तन फाउंडेशन च्या कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला.
परिवर्तन फाउंडेशनच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त बोलताना परिवर्तन फाऊंडेशनच्या महिला जिल्हा अध्यक्षा लैला जमादार म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते छत्रपतींचा काळ हा कल्याणकारी राज्य म्हणून ओळखला जात होता लोकहिताच्या अनेक कार्य करण्यात आले त्यांना जाणता राजा आदर्श राजा असे म्हणत यांचे आदर्श व कार्य विचार आचरणात आणावे असे लैला जमादार व दिलखुस तांबोळी यांनी सांगितले.
या कार्यक्रमास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अश्फाक शेख सर, इकबाल शेख,अहमद कोतवाल,नसीमा शेतसंधी, दिलखुश तांबोळी, लैला जमादार,संगीता शिरसागर, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment