सारा न्यूज नेटवर्क -
सोलापूर लोहमार्ग पोलीसांची कामगीरी, आरोपीकडून १४ लाखांचे २० किलो ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे देवीदेवतांचे मुर्त्या केले हस्तगत..
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे कडेस मिळालेल्या माहीती प्रमाणे गाडी नं २२७१८ सिंकद्राबाद राजकोट एक्सप्रेस गाडीचे बोगीने एस/५, एस/६ मध्ये तीन संशयीत इसम हे सिंकद्राबाद येथील सोनाराचे घरातुन कोणीही नसल्याचे फायदा घेवून १४,००,०००/- (चौदा लाख रू. ) किंमतीचे २० किलो ३०० ग्रॅम वजनाचे चांदीचे देवीदेवतांचे मुर्त्या चोरून घेवून जात असल्याचे माहीती मिळालेप्रमाणे पोलीस ठाणेकडील नेमणुकीचे सपोफी संजय जाधव, पो हवा ७५६ प्रकाश जिराळ, पो हवा ८७ प्रमोद सुरवसे, पो कॉ २७० संतोष सवळी तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांचेकडील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय वाघमारे, पो हवा ७५४ विजय कांबळे यांनी व आरपीएफ कडील स्टाफ असे जावून सदर गाडी अटेंन्ड करून नमुद बोगीतून तीन संशयीताना व त्याचेजवळ असलेले एक काळया रंगाची बॅग ताब्यात घेवून पोलीस ठाणे येथे आणले,
त्याचेकडे त्याचे नांव गांव विचारता त्यांनी त्याचे नांव सुनिलसिंग शेरसिंग रावत वय २४ वर्षे राह. मन्नावास थाना जवाजा ता. ब्यावर जि. अजमेर राज्य राजस्थान असे असल्याचे सांगीतले. त्याचेसोबत आणखीन दोन अल्पवयीन मुले आहेत त्याचेकडे सदरबाबत विचारपूस केले असता त्यांनी त्याचे घरी पैशाचे अडचण असल्या कारणाने सदरची चोरी केली असल्याचे सांगीतले. तसेच मार्केट पोलीस ठाणे सिकद्राबाद येथे नमुद संशयीत व चांदीचे दागीने बाबत गु र न ३१/२०२४ कलम ४२०, ४०९ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले, तरी मार्केट पोलीस ठाणे सिंकद्राबाद येथील पोलीस उप निरीक्षक श्री लक्ष्मय्या व पोलीस स्टाफ असे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांचे ताब्यात तीनही संशयीतांना व मुददेमाल त्यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची उत्कृष्ठ कामगीरी मा. पोलीस अधिक्षक साो लोहमार्ग पुणे श्री. तुषार दोषी उप विभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार), सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री. संतोष गायकवाड, सपोफौ संजय जाधव, पो हवा प्रमोद सुरवसे, पो हवा. प्रकाश जिराळ, पो कॉ संतोष सवळी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांचेकडील पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय वाघमारे, पो हवा विजय कांबळे यांनी व आरपीएफ कडील स्टाफ यांनी केली आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment