Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Tuesday, February 20, 2024

प्रभाग 26 मधील समर्थ सोसायटी सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन.

 


सारा न्यूज नेटवर्क - 

प्रभाग 26 मधील समर्थ सोसायटी सोरेगाव येथे ड्रेनेज कामाचे उद्घाटन.

 माजी नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांच्या प्रयत्नाला यश.

सोलापूर (प्रतिनिधी) :- जुळे सोलापुरातील प्रभाग २६ मधील शेवटचा भाग म्हणून समर्थ सोसायटी याची ओळख आहे हद्दवाढ झाल्यापासून तेथे कोणाच्याच सुविधा झाल्या नव्हत्या तेथील नागरिक यांनी सतत नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्याकडे सदर समस्या बाबत पाठपुरावा केला होता. त्यांच्या समस्या लक्षात घेऊन शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी, निधीसाठी शासन दरबारी व आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे.

 त्यामुळे सदर नगराच्या ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. व प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्यामुळे तेथील नागरिक यांच्या चेहऱ्यावर आनंद सोडून वाहत होता.

तसेच सदर ड्रेनेजचे काम झाल्यानंतर शासनाच्या नगरोस्थान योजनेअंतर्गत रस्ते कामासाठी निधी मंजूर झालेला असून लवकरच रस्ते कामाला सुरुवात होणार आहे अशी प्रतिक्रिया नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण यांनी सांगितले.

त्यावेळी तेथील नागरिक यांनी आपले मनोगत व्यक्त केले की आम्ही हद्दवाढ झाल्यापासून सदर नगरामध्ये राहात असून आम्हाला कोणत्याच मूलभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे वारंवार निवेदन दिले होते. परंतु निधी अभावी आमच्या नगरातील विकास कामे होत नव्हती व आमची दखल घेत नव्हते.परंतु नगरसेविका सौ.राजश्री चव्हाण व दक्षिणचे आमदार श्री सुभाष बापू देशमुख यांना समक्ष भेटून निवेदन दिले होते.

 त्याची दखल घेत शासनाच्या नगरोस्थान, मूलभूत सुविधा, गुंठेवारी निधीसाठी सतत पाठपुरावा केल्यामुळे जवळपास 40 लाखाचा निधी उपलब्ध झाल्याने आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली हे आमच्यासाठी आनंदाची बाब आहे अशा प्रतिक्रिया तेथील नागरिकांनी बोलून दाखवल्या व तसेच नगरसेविका सौ राजश्री चव्हाण यांच्यासारख्या कार्यतत्पर नगरसेविका आम्हाला लाभल्या हे आमचे भाग्य समजतो अशा प्रतिक्रिया दिल्या.

सदर प्रसंगी अध्यक्ष विनोद बागल, रवींद्र पाटील, संचालक पंढरीनाथ येळे ,सुनील मेंगाणे, बापूसाहेब गोरे,प्रकाश नरहिरे,मच्छिंद्र डोके, प्रतापेश्वर जाधव, विजय पावले, झुंजम सर, खुणे सर, डोळसे सर, हांडे सर, धोंडे सर, हजारे साहेब, गावडे सर, कटकधोड, राठोड सर, मुद्दे साहेब, शेवंते सर, सौ दूधभाते, सौ.गावडे, सौ. कुलकर्णी  उपस्थित होते व केले कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केल्या.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment