सारा न्यूज नेटवर्क -
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय नेते डॉ राजेंद्र गवई यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार..
सोलापूर (प्रतिनिधी ) :- आंबेडकरी चळवळी चे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट ) चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ राजेंद्र गवई हे सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामग्रह सोलापूर येथे पत्रकार सुरक्षा समिती च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा केली तसेच राज्यातील पत्रकारांच्या अडचणी बाबत लक्ष घालून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची मागणी केली त्याच बरोबर डॉ राजेंद्र गवई यांचा शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार केला.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत माळवदे, जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस )
सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे, विठ्ठल वठारे, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, रविकांत रणदिवे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे प्रदेश अध्यक्ष सुबोध वाघमोडे, चंद्रशेखर निमल, अबूतकर तांबोळी इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment