Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Thursday, February 22, 2024

विजापूर नाका पोलीस ठाणे डी. बी. पथकाची दमदार कामगिरी, 4 मोटार सायकली व एक मोबाईल जप्त..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

विजापूर नाका पोलीस ठाणे डी. बी. पथकाची कामगिरी ४ मोटार सायकल व एक मोबाईल जप्त.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- मागील काही दिवसांपासुन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यास अनुसरुन मा. पोलीस आयुक्त सो, मा. पोलीस उप आयुक्त सो (परिमंडळ) यांनी वेळोवेळी मिंटीग घेऊन अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणणेकरीता गुन्हे प्रकटीकरण पथकास सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार विजापुर नाका पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपी यांचा कसोशीने शोध चालु होता.

विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास दि.१२/०२/२०२४ एक इसम एका मोपेड मोटारसायकलवर चोरीचा मोबाईल घेऊन मुलतानी बेकरी, होटगी रोड, सोलापुर येथे येणार आहे. अशी माहीती मिळाल्याने विजापुर नाका पो.स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकातील आधिकारी व पोलीस अमंलदार असे मुलतानी बेकरी, होटगी रोड,सोलापुर येथे जाऊन आरोपी नामे आसिफ मुख्तार खान वय ३२ वर्षे कायम रा- गिलबटील रोड, पाटकर वाडी जवळ, अंधेरी, वेस्ट मुंबई, सध्या रा. साईनाथ नगर भाग २ मजरेवाडी, सोलापूर या अटक करून त्याच्या ताब्यातुन किल्लेदार मंगलकार्यालय सोलापूर येथे मोकळ्या मैदानात पार्क केलेली मोटार सायकलीला आडकविलेल्या पर्स मधुन चोरीस गेलेला VIVO v 23 कंपनीचा मल्टीकलरचा मोबाईल तसेच सदर आरोपीच्या ताब्यातील काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची मोपेड गाडी जप्त करून विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील एक गुन्हा तसेच सांताक्रुज पोलीस स्टेशन मुंबई येथुन चोरीस गेलेली काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची मोपेड मोटार सायकल जप्त करून एकुण ६०,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन गुन्हे उकडकीस आणले आहे.


तसेच दि.१७/०२/२०२४ रोजी विजापुर नाका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास गुप्त बातमीदार मार्फतीने बातमी मिळाली की, एक इसम सोरेगाव, सोलापुर येथे चोरीची मोटार सायकल घेऊन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने विजापुर नाका पो.स्टे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अमंलदार असे मिळुन सोरेगाव सोलापुर येथे सापळा रचुन शिताफीने अल्पवयीन बालक नामे यलप्पा शिवाजी कुद्रे वय १५ वर्षे, रा. मु.पो. टाकाळी बी.एस.एफ. कॅम्प जवळ, ता. दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर यास ताब्यात घेऊन, विजापुर नाका पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३/२०२४ भा.दं.वि.क. ३७९ या गुन्ह्यातील चोरीस गेलेली पल्सर २२० मोटार सायकल त्याचा ताब्यात मिळुन आल्याने त्यास सदर गुन्ह्याचे तपास कामी ताब्यात घेऊन त्याच्या पालकांसमक्ष त्याच्याकडे अधिक विश्वास घेऊन चौकशी केली असता अल्पवयीन बालकांने सांगितले की," अल्पवयीन बालक व त्याचा साथीदार असे दोघे मिळून जानेवारी २०२४ महिन्यात मध्य रात्रीच्या वेळी विजापूर रोड, सोलापूर याभागातुन २ मोटार सायकली तसेच बेलाटी या गावातुन एक मोटार सायकल चोरी केल्याचे निष्पन्न कबुली विजापूर नाका पोलीस स्टेशन कडील २ गुन्हे व सलगर वस्ती, पोलीस स्टेशन एक असे एकुण तीन गुन्हे उघडकीस आणुन त्याच्या ताब्यातुन एकुण १,०५,०००/- मुद्देमाल जप्त केला आहे.


विजापूर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाने एक आरोपी व एक अल्पवयीन बालक यांच्याकडुन विजापूर नाका पोलीस ठाणे कडील २ मोटार सायकल व एक मोबाईल चोरीचे गुन्हे उघड केले. तसेच सलगर वस्ती पोलीस ठाणे सोलापूर शहर कडील एक मोटार सायकलची चोरीचा गुन्हा व सांताक्रुज पोलीस स्टेशन मुंबई शहर येतील मोटार सायकलची चोरीचे गुन्हे उघड करून एकुण ४ मोटार सायकल व १ मोबाईल जप्त करून एकुण १,६५,०००/- रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार साो, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) श्री विजय कबाडे साो, सहा. पोलीस आयुक्त वि -२ श्री अजय परमार सो, वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री शहाजी पवार सो, श्री उमाकांत शिंदे साो (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख पोउपनि मुकेश गायकवाड, पोहेकों/ सचिन हार, पोना/गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकों/संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, कोर्सेगाव, यांनी पार पाडली.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment