Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 5, 2024

संत रविदास महाराज जयंती उत्सव अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्षपदी राम हुंडारे यांची निवड...

 



सारा न्यूज नेटवर्क - 

संत रविदास महाराज जयंती उत्सव अध्यक्षपदी ज्ञानेश्वर पवार, कार्याध्यक्षपदी राम हुंडारे यांची निवड.. 

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी संत रोहिदास महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने मंडळाचे नियोजन, शहरातील पदाधिकारांचे निवड, बैठक शासकीय विश्रामगृह सात रस्ता सोलापूर येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज दादा गायकवाड होते. यावेळी सोलापूर शहर जिल्हा जयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या. 

या निवडी मध्ये उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, उत्सव समिती कार्याध्यक्ष राम हुंडारे, उत्सव समिती कार्यवाहक विराज लालसरे, प्रसिद्धीप्रमुख विजय चव्हाण, सचिव महेश उम्बर्गीकर या सर्वांची एकमताने निवड करण्यात आली आहे.  


तसेच या कार्यक्रमास गुरुवयर्य शुभम दादा कांबळे वाघोली पुणे यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी सांगितले. याप्रसंगी हुमान राईचे विजय चव्हाण, सागर दोडमनी, राजेश परदेशी आदी समाज बांधव मित्रपरिवार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होता. 

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment