Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Saturday, February 3, 2024

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आगळा वेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आगळा वेगळा हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा..

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर मध्ये मकर संक्रांतीचा सण मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या महिन्यात सिद्धरामेश्वर यात्रा आणि गड्डा यात्रा भरते. याचे औचित्य साधून सोलापूर मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न केला जातो. 


असाच स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या वतीने आज आगळा वेगळा हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला होता. या हळदी कुंकवाचा कार्यक्रमात स्त्री शक्ती सोशल फाउंडेशनच्या सदस्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचा आनंद घेतला.खास करून युवती आणी विधवा महिला साठी हा कार्यक्रम घेण्यात आला.सर्व महिलांनी महाराष्ट्रीयन गेटअप केला होता. नथीचा नखरा हा कन्सेप्ट होता.महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी खेळ घेण्यात आले.सर्व महिला खूप एन्जॉय केले .

महाराष्ट्रीयन गेटअप ला बक्षीस प्रियांका भोसले यांना देण्यात आला. तसेच तळ्यात मळ्यात हा खेळ घेण्यात आला. त्या मध्ये शकुंतला माशाळकर यांनी हा खेळ जिंकला.

कार्यक्रमाचे आयोजन संस्थाचे सर्व पदाधीकारी ने पार पाडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्त्री शक्ती सोशल फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्षा किरण दीदी माशाळकर, अर्चना माशाळकर, शकुंतला माशाळकर,संस्थे चे कार्यकारी समिती चे अध्यक्ष डॉ.भाग्यश्री राठोड,उपाध्यक्ष सारिका मदने,सचिव तेजश्री राऊत,सहसचिव मयुरी कोटापल्ली,खजिनदार मधुरा बेत, प्रियांका भोसले,स्नेहा काटवे ,दिव्यांनी कणसे,भाग्यश्री डिगे,पूजा शर्मा,उमा नागनसुरे , संजीवनी घवाणे , सन्मती मरोड आणी संस्थेचे इतर सदस्य या सर्वांची उपस्थिती होती.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment