Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Monday, February 26, 2024

संत रोहिदास महाराज यांच्या ६४७व्या जयंतीनिमित्त विविध स्तुत्य उपक्रम संपन्न..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संत रोहिदास महाराज यांच्या ६४७व्या जयंतीनिमित्त विविध स्तुत्य उपक्रम संपन्न.

सोलापूर(प्रतिनिधी) :- .सालाबादप्रमाणे याही वर्षी जी के मागासवर्गीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या 647 व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गोर- गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,निराधार महिलांना थंडीत मायेची म्हणून ब्लॅंकेट वाटप, जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले 


तसेच श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना व इतर शासकीय योजनेतील लाभार्थ्यांना जी के मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांनी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा करून लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिल्याचे मंजुरी आदेश पत्र वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा गट) महिला प्रदेश सरचिटणीस सुवर्णाताई झाडे- खेलबुडे, मीनाताई भाकरे, माताजी रेणुका, गीता हुंडारे ,छाया पवार,विमल पवार ,राधिका पवार ,सुनील बडवणे, पौर्णिमा गायकवाड ,छाया बाबर, पद्मिनी वाघमोडे, विद्या सलगर, उमा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते . 

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तसेच संत रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले तद्नंतर गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले,


 समाजातील वंचित- पीडित घटकातील निराधार महिलांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले. विशेषतः महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला वर्गासाठी मनोरंजन म्हणून हिंदी,मराठी चित्रपटातील सदाबहार गाणी 'सदाबहार स्टुडिओचे सर्वेसर्वा गायक नागेश कणकी सर, गायिका अंजली कणकी, आकाश कणकी,सिद्धार्थ भडकुंबे आदी कलावंतांनी गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

जीके मागासवर्गीय संस्थेच्या वतीने उपस्थित सर्वच प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष दादा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळेस जीके मागासवर्गीय बहुउद्देशीय संशोधन संस्थेचे उत्सव समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार,कार्याध्यक्ष राम हुंडारे,विष्णू कांबळे, महेश उंबरीकर आदींसह जी के मागासवर्गीय भोवतीचे संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले तर आभार संतोष दादा गायकवाड यांनी मानले.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment