सारा न्यूज नेटवर्क -
ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यातील 25,000 रुपये रक्कम फिर्यादीस परत करण्यास धाराशिव सायबर पोलीसांना यश...
धाराशिव (प्रतिनिधी) :- दिनांक 21.08.2023 रोजी फिर्यादी नामे- विजयकुमार विठ्ठल देशमुख, रा. केशव नगर धाराशिव यांना घरात वापरायचे फर्निचर स्वस्तात विकणे आहे अशी मित्राने त्यांचे फेसबुक खात्याचे मेसेंजरवर सांगितल्याने फिर्यादी यांनी सदर फर्निचर साठी मित्राने पाठवलेल्या मेसेजवर विश्वास ठेवून त्यांनी पाठवलेल्या क्युआर कोड वर एकुण 25,000 पाठवले परंतु त्यांना सदर फर्निचर हे मिळाले नसल्याने त्यांची फसवणुक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने विजयकुमार देशमुख यांनी पोस्टे सायबर येथे सदर घटनेबाबत फिर्याद दिल्याने पोलीस ठाणे सायबर येथे गुरनं 16/2023 कलम 420 सह कलम 66 डी माहिती तंत्रज्ञान अधिनियम सन 2008 अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.
सदर गुन्हृयाच्या तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमती बबीता वाकडकर, पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे व महिला पोलीस अमंलदार/968 व्हंदरगुंडे सह सायबर पोलीस ठाण्याचे पथक यांनी नमुद गुन्ह्याचे तपासात तांत्रिक विश्लेषण करुन तसेच आरोपीचे बॅक खात्यांची माहिती घेवून फिर्यादी यांनी पाठवलेले 25,000 रुपये रक्कम होल्ड करुन सदर रक्कम ही मा.न्यायालयाचे आदेशावरुन फिर्यादीस परत करण्यात यश मिळवले आहे.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment