Sara News Network

*मुख्य संपादक - राम हुंडारे*

Sunday, February 25, 2024

संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी मोनाली धुमाळ यांची निवड..

 


सारा न्यूज नेटवर्क - 

संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी मोनिका धुमाळ यांची निवड

 सोलापूर( प्रतिनिधी) :- संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेच्या महिला आघाडीच्या शहर प्रमुख पदी मोनाली वैभव धुमाळ यांची निवड करण्यात आली संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. 

जुळे सोलापुरात संभाजी ब्रिगेडची बैठक पार पडली या बैठकीत सोलापूर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मोनाली धुमाळ यांची निवड करण्यात आली सोलापूर शहरातील महिलांचे विविध प्रश्न सोडवण्याचे व महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून करणार असल्याचे नूतन शहराध्यक्ष मोनाली धुमाळ यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहरप्रमुख सीताराम बाबर रमेश चव्हाण,पिंटू किरसावंगी, अजित पाटील तसेच तिसरी आंख मानवाअधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे जिल्हा कार्याध्यक्ष वैभव धुमाळ,जिल्हा सचिव नर्सिंग मंडल , चेतन सुरवसे, शशिकांत माचनुरकर, शकील शेख,व तिसरी आंख मानवाधिकार संघटनेचे महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीता(ताई) बोकडे,गायत्री मेणसे, सुजाता काळे,शिल्पा कोळी, निरजा महेंद्रकर, वंदना रेवणे, राणी माळगे, वंदना महासोडे, रत्‍नाबाई भालेराव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सारा न्यूज नेटवर्क

संपादक - राम हुंडारे

No comments:

Post a Comment