सारा न्यूज नेटवर्क -
*तालुका उत्तर चे प्रभारी तहसीलदार विजय कवडे यांचा पत्रकार सुरक्षा समिती वतीने सत्कार*
सोलापूर (प्रतिनिधी ) :- महसूल खात्यातील शांत संयमी व शिस्तप्रिय तसेच उत्तर तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांचे समस्याचे निराकरण करणारे नायब तहसीलदार विजय कवडे यांची उत्तर सोलापूर तालुका प्रभारी तहसीलदार म्हणून नियुक्ती झाली आहे त्यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष सादिक शेख यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद दैनिक अब तक चे संपादक प्रसाद जगताप साप्ताहिक अंतिम न्यायचे कार्यकारी संपादक अकबर शेख दस का न्यूज नेटवर्कचे रोहित घोडके साप्ताहिक प्रबोधन चे रिजवान शेख मल्लिनाथ कोळी अश्फाक शेख इत्यादी उपस्थित होते.
सारा न्यूज नेटवर्क
संपादक - राम हुंडारे
No comments:
Post a Comment